मुंबई : ओमायक्रॉनमुळे करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून रेल्वे कारखान्यातील कर्मचारीही यातून सुटू शकलेले नाहीत. रेल्वेच्या लोअर परळ आणि महालक्ष्मी कारखान्यांत गेल्या तीन दिवसांत १२० हून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली.
मुंबईतील रेल्वेच्या लोअर परळ, महालक्ष्मी, माटुंगा, परळ या कारखान्यांमध्ये करोना चाचणीचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ४ जानेवारीला लोअर परळ कारखान्यातील ६२ कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी सकारात्मक आली. हे कर्मचारी कारखान्यातील उत्पादन, वातानुकूलित चेअर कार, गाडय़ांचे चाक बनविणे इत्यादी विभागांतील आहेत. या वृत्ताला पश्चिम रेल्वेनेही दुजोरा दिला आहे. तर ५ जानेवारीला महालक्ष्मी रेल्वे कारखान्यातील ६९ कर्मचारीही आरटीपीसीआर चाचणीत बाधित आढळले आहेत. अन्य कारखान्यांतही कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वेच्या मुंबईतील जगजीवनराम रुग्णालयात आणि गृह विलगीकरणात ५५७ करोनाबाधित कर्मचारी उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मध्य रेल्वेचेही कर्मचारी आहेत.
The post रेल्वे कारखान्यांना करोनाचा विळखा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/34sLPP0
via
No comments:
Post a Comment