मुंबई : राज्यात करोनाचा उद्रेक झाल्याने ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गुरुवारी सांगितले.
करोनाची रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असून राज्यभरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही संसर्ग होत आहे. मुंबईत नव्याने ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली असून राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला होता. राज्यात ७१ पोलिसांचे करोनामुळे निधनही झाले आहे.
बंदोबस्तावर असताना पोलिसांचा सार्वजनिक ठिकाणी व गर्दीत वावर असतो. त्यामुळे ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना करोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेण्याच्या दृष्टीने खासगी कंपन्यांच्या धर्तीवर घरून काम करण्याची मुभा देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.
The post ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना घरातून कामाची मुभा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3r1JulQ
via
No comments:
Post a Comment