धारावीमधील प्रकार; सायबर कॅफे मालकाला अटक
अनिश पाटील, लोकसत्ता
मुंबई : करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा लसीकरण वाढण्यासाठी प्रयत्न करत असताना धारावीमध्ये लसीकरणाच्या बनावट प्रमाणपत्राची एक हजार रुपयांत सर्रास विक्री करण्यात येत होती. विशेष म्हणजे कोविन या सरकारी संकेतस्थळावरही या बनावट प्रमाणपत्राची नोंद याप्रकरणी एका सायबर कॅफे मालकाला धारावी पोलिसांनी अटक केली.
लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतरही धारावीतील लसीकरणावर प्रशासन विशेष लक्ष देत आहे. याच धारावीत बनावट लसीकरणाचे नवे प्ररूप उभे राहिले आहे. अवघ्या एक हजार रुपयांत लशाच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्राची सर्रास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. एकही दिवस मुंबई बाहेर न जाता बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
काय घडले?
धारावीतील एका सायबर कॅफे मालकाकडून हे प्रमाणपत्र मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सेकारन फ्रान्सिस नाडर(३६) हा सायबर कॅफे मालक अवघ्या एक हजार रुपयांमध्ये करोना लसीच्या मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पुरवत होता. पोलिसांनी एका ग्राहकाला त्याच्याकडे पाठवले. नाडरने त्याला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला धारावी पोलिसांनी बुधवारी अटक केली. पाठवलेला ग्राहक मुंबईत असतानाही बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आरोपीने यापूर्वी किमान चार जणांचे लसीकरण केल्याची माहिती हाती लागली असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय खंडागळे यांनी सांगितले. कोविनमध्येही त्रुटी? बनावट प्रमाणपत्राची केंद्र सरकारच्या कोविन या संकेतस्थळावरही नोंद झाली आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
आरोपीकडे पाठवण्यात आलेल्या ग्राहकानेही लस घेतल्याचे प्रमाणपत्र कोविन या संकेतस्थळावर दिसते आहे. अधिकृतरित्या लसीकरण केल्यावर दोन मात्रांमधील तुकडी क्रमांक वेगवेगळा असतो. पण याप्रकरणात दोन्ही मात्रा एकाच तुकडीत झाल्याचे दिसत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
The post एक हजार द्या, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JNQQlu
via
No comments:
Post a Comment