गर्दीमुळे अंतर नियमांचे उल्लंघन, करोना प्रसाराची भीती
मुंबई: करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूमुळे संसर्ग वेगाने होऊ लागला असताना मुंबईतील रेल्वेच्याच चारही कारखान्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे बायोमेट्रिक हजेरीचे संकट उभे ठाकले आहे. या कर्मचाऱ्यांना उपस्थितीसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असल्याने दररोज या
यंत्रांसमोर कर्मचाऱ्यांची रांग लागत आहे. यावेळी अंतर नियम पाळले जात नसल्याने करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पश्चिम रेल्वेवर लोअर परळ, महालक्ष्मी, मध्य रेल्वेवर परळ, माटुंगा रेल्वे कारखाने आहेत. माटुंगा कारखान्यात साधारण तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. तर परळ कारखान्यात ८००, लोअर परळ आणि महालक्ष्मी कारखान्यातही चार हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी नव्या प्रकारच्या बायोमेट्रीक मशिन कारखान्यात बसवण्यात आल्या आहेत. यात दोन प्रकार असून मशिनसमोर जाऊन चेहऱ्याची ओळख पटवावी लागते. त्यासाठी मास्क खाली करावा लागतो. यात काही समस्या उद्भवल्यास अंगठ्याचा ठसा उमटवण्याचाही (थम्ब इम्प्रेशनचा) पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हजेरीची नोंद ठेवता येते.
यात बराच वेळ जात असल्याने हजेरीसाठी कर्मचाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत असून शारीरिक अंतर नियमाचाही फज्जाच उडत असल्याचे चित्र आहे. सध्या मुखपट्टी बंधनकारक असताना या मशिनच्या अगदी जवळ जाऊन चेहऱ्याची ओळख पटवावी लागत आहे. हजेरीसाठी लागणाऱ्या वेळेमुळे वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीपुढे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरातून
अगदी लवकरच बाहेर पडावे
लागते. करोनाकाळात हजेरीची ही पद्धत धोकादायक असल्याने ती बंद करुन कार्ड पंच किंवा अन्य पर्याय देण्याची मागणी कर्मचारी करत आहेत.
बायोमेट्रिकमध्ये चेहरा किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून हजेरी द्यावी लागत आहे. रेल्वे कारखान्यात ही हजेरी सुरु आहे. दुसरीकडे रेल्वेची अन्य कार्यालये तसेच अन्य खासगी कार्यालयांमध्येही अशा प्रकारची हजेरी सध्या वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे बंद ठेवली आहे. हजेरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा पर्याय देण्याची मागणी असून त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शरीफ पठाण, अध्यक्ष, पश्चिम रेल्वे मजदूर संघ (मुंबई अध्यक्ष)
The post बायोमेट्रिक हजेरीमुळे रेल्वे कर्मचारी चिंतेत; गर्दीमुळे अंतर नियमांचे उल्लंघन, करोना प्रसाराची भीती appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F1dNOg
via
No comments:
Post a Comment