मुस्लीम महिलांच्या बदनामीप्रकरणी तिघांना अटक - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

मुस्लीम महिलांच्या बदनामीप्रकरणी तिघांना अटक

मुंबई: अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांची बदनामी केल्याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी बुधवारी दिली. 

अ‍ॅपद्वारे मुस्लीम महिलांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करून आभासी लिलाव करण्यात येत असल्याची तक्रार सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासात सहा महिन्यांपूर्वी एका अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांचे छायाचित्र प्रदर्शित करून आभासी लिलावाद्वारे विक्री करण्याकरिता गिटहब या माध्यमाचा वापर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता अ‍ॅपचा वापर करून मुस्लीम महिलांची बदनामी करण्याच्या हेतूने त्यांचे छायाचित्र प्रसारित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हे ट्विटर हँडल विशाल कुमार झा (२१) हा वापरत असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  त्याने दिलेल्या माहितीवरून तपासासाठी उत्तराखंड येथील रुद्रपूर येथे एक पथक रवाना झाले होते. त्या पथकाने याप्रकरणी श्वेता अनंत सिंह (१८) या तरुणीला अटक केली.

 या प्रकरणात वापरण्यात आलेली संशयित ट्विटर हँडल श्वेता सिंहने बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर आरोपी मयंक प्रदीपसिंह रावत ( २१) यालाही बुधवारी सायबर पोलिसांनी अटक केली. हे सर्व आरोपी समाजमाध्यमांवर एकमेकांच्या संपर्कात होते. पोलीस याप्रकरणी आरोपींच्या बँक खात्याची तपासणी करत आहे.  याप्रकरणी सायबर पोलीस सखोल तपास करणार असल्याचे नगराळे यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी कोणाला अधिक माहिती असेल, अशा व्यक्तींनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही नगराळे यांनी केले. इतर राज्यांतील पोलिसांकडून या प्रकरणाबाबत सहकार्य मिळत नसल्याबाबत नगराळे यांनी नाराजी व्यक्त केली.

 झा हा बंगळूरु येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होता. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचा या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

सहा ट्विटर खाती बंद

अटक आरोपी विशालकुमार झा याने गुन्ह्यांत सहा ट्विटर, दोन इन्स्टाग्राम व सात जीमेल खात्यांचा वापर केला आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावल्यानंतर त्याने सहा ट्विटर खाती बंद केल्याचे निष्पन्न झाले आहे.

The post मुस्लीम महिलांच्या बदनामीप्रकरणी तिघांना अटक appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3G0Z5bk
via

No comments:

Post Bottom Ad

Pages