रेलकॉन इन्फ्रा आणि अहलुवालिया यांच्यात स्पर्धा
मुंबई : मागील १३ वर्षापासून रखडलेला पत्राचाळ पुनर्विकास अखेर आता प्रत्यक्षात मार्गी लागत आहे. त्यानुसार बुधवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्विकासाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला.
मंडळाने पुनर्वसित इमारतीच्या बांधकामासाठीच्या आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत. रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टस या दोन कंपन्या स्पर्धेत आहेत.
मुंबई मंडळाने पुनर्वसित इमारतीसह आपल्या हिश्श्यातील इमारतीचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी निविदा काढून रखडलेल्या पुनर्विकासाला नव्याने सुरुवात केली आहे. या इमारतींच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा काही दिवसांपूर्वी खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड आणि अहलुवालिया या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. तर मंगळवारी आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून आता या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे.
यासंबंधीचा अंतिम निर्णय गृहनिर्माण विभागाकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविला जाईल.
पुनर्वसित इमारतीचे ५५ टक्के काम शिल्लक
इमारतीच्या पुनर्वसनाचे काम आधीच्या विकासकाने अर्धवट सोडून दिल्याने मागील १३ वर्षांपासून ६७२ मूळ भाडेकरू बेघर आहेत. पण आता मात्र येत्या दोन-अडीच वर्षात त्यांना हक्काच्या घरांचा ताबा मिळणार आहे. पुनर्वसित इमारतीच्या बांधकामासाठीच्या निविदा अंतिम झाल्या की तात्काळ कंत्राटदाराला कार्यादेश देत कामाला सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. विकासकाने ११ मजली ८ इमारतीचे (१६ विंगसह) ४५ टक्केच काम पूर्ण केले असून आता उर्वरित ५५ टक्के काम पूर्ण करण्याची जबाबदारी या नव्या कंत्राटदारावर असणार आहे. हे काम दोन ते अडीच वर्षांत पूर्ण करून घेण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
The post पत्राचाळ पुनर्विकासासाठी दोन कंपन्या इच्छुक; रेलकॉन इन्फ्रा आणि अहलुवालिया यांच्यात स्पर्धा appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/34r4lXZ
via
No comments:
Post a Comment