राज्यात सरकार नव्हे, तर टोळीचे राज्य ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

राज्यात सरकार नव्हे, तर टोळीचे राज्य ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

मुंबई : राज्यात सध्या सरकार सत्तेवर नसून टोळीचे राज्य आहे, असे टीकास्त्र सोडत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार पळपुटे आणि खंडणीखोर असल्याचा आरोप केला.

भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणाले, या सरकारमध्ये विकासकामांसाठी कुणीही भांडत नाही, तर टक्केवारीसाठी भांडणे होतात. राज्यात लाखो तरुण वैफल्यग्रस्त आहेत. ते बराच काळ स्पर्धा परीक्षांची तयारी मनापासून करतात. पण त्या परीक्षा मंत्रालयात आधीच ’ठरवून’ ठेवलेल्या असतात. गैरप्रकार करणाऱ्या न्यासा, जीए सॉफ्टवेअरसारख्या कंपन्यांनाच परीक्षांची कामे दिले जातात. 

विद्यापीठांनाही शासकीय महामंडळे करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे चर्चेविना रात्री उशीरा विधिमंडळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. कुलगुरुंना ‘बाबू’ करणारा हा प्रस्तावित कायदा असून विद्यापीठे पदव्या विकणारी केंद्रे होतील.

अधिसभेचे संचालन मंत्री करतील. विद्यापीठांना राजकारण व भ्रष्टाचाराचे अड्डे बनविण्याचे सरकारचे धोरण असल्याने उच्चशिक्षणमंत्र्यांनी या कायद्याद्वारे विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक अधिकार आपल्याकडे घेतले आहेत.त्यामुळे मोठय़ा संघर्षांला भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते बुधवारी उत्तर प्रदेशला रवाना झाले.

मुंबई-पुणे विद्यापीठांचे जेएनयू करायचे आहे काय?

मुंबई-पुणे विद्यापीठांचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ( जेएनयु)  करायचे आहे का, पुढील एल्गार परिषद आता विद्यापीठांमध्ये होणार आहे का, विद्यापीठांची  उपकेंद्रे शिवसेना शाखेतून वाटली जाणार आहेत का, असे सवाल करीत भाजप आमदार आशीष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली. विद्यापीठ कायद्यात बदल करताना राज्य सरकारने राजकीय चंचुप्रवेश केला आहे. राज्यपालांचे, कुलगुरूंचे अधिकार सीमित करुन विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात आणल्याची टीका त्यांनी केली.

The post राज्यात सरकार नव्हे, तर टोळीचे राज्य ! देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mZRmD2
via

No comments:

Post Bottom Ad

Pages