मुंबईत वर्षभरात ६२ हजार घरांची विक्री ;‘नाईट फ्रँक’चा अहवाल जाहीर - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

मुंबईत वर्षभरात ६२ हजार घरांची विक्री ;‘नाईट फ्रँक’चा अहवाल जाहीर

मुंबई : मुंबई परिसरात मावळत्या वर्षांत ६२ हजार घरांची विक्री झाली असून सुमारे ७० हजारे नव्या घरांची भर पडली आहे. देशाच्या तुलनेत एकूण आठ प्रमुख शहरात एकटय़ा मुंबई परिसरात २९ टक्क्यांच्या आसपास घरांची विक्री तर ३९ टक्के इतकी नव्या घरांची भर पडली आहे. राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे घरविक्री गेल्या वर्षांत वाढली होती. परंतु यंदा अशा प्रकारची कुठलीही सवलत नसतानाही घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

नाईट फ्रँक या सर्वेक्षण कंपनीने जाहीर केलेल्या सहामाही अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. मुंबई महानगर परिसरात गेल्या सहा महिन्यात ५० टक्क्यांहून अधिक घर विक्रीची नोंद झाली आहे. सुमारे ३४ हजार ३८२ सदनिकांची या सहा महिन्यात विक्री झाली. मुंबईतील सरासरी भाडेदरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने रद्द केल्यानंतर विकासकांनी पुढाकार घेत सादर केलेल्या विविध योजनांमुळे घरविक्री वाढली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुस-या लाटेमुळे पहिल्या सहामाहीमध्ये घरांच्या विक्रीवर काहीसा परिणाम झाला असला तरी गेल्या सहा महिन्यात घरविक्री वाढल्याचे दिसून येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात मुंबईत घरांची विक्री लक्षणीय झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात ठाण्यात घरांच्या विक्रीत घट झाल्याचे आढळून आले आहे. यंदा उपनगरात नव्या घरांच्या निर्मितीत वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.  पुण्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत ३८ टक्के घरविक्री (३७ हजार २१८) अधिक झाली तर ४० हजार ४८९ घरांची नव्याने निर्मिती झाली.

नाइट फ्रँक इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक गुलाम झिया म्हणाले की, गेल्या १२ ते १५ महिन्यांमध्ये मुद्रांकशुल्क माफी, गृहकर्ज तसेच  व्याजदरांमध्ये कपात अशा प्रोत्साहनात्मक सवलतींमुळे घरविक्रीला चांगलीच चालनाच मिळाली. विकासकांनीही बदलत्या बाजारपेठाचा विचार करून घरखरेदीदारांना आणखी सवलत दिल्यामुळे घरविक्रीला उठाव आला. परिणामी नव्या वर्षांत घरविक्री तसेच निर्मितीत वाढ होण्याची शक्यता आहे.

The post मुंबईत वर्षभरात ६२ हजार घरांची विक्री ;‘नाईट फ्रँक’चा अहवाल जाहीर appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Fb7zM5
via

No comments:

Post Bottom Ad

Pages