महाराष्ट्रात ‘गोएन क्रिकेट फ्रॉग’चे अस्तित्व - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

महाराष्ट्रात ‘गोएन क्रिकेट फ्रॉग’चे अस्तित्व

मुंबई : यापूर्वी फक्त गोव्यात आढळलेल्या बेडकाच्या एका प्रजातीचे अस्तित्व प्रथमच महाराष्ट्रात दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाटणे या गावी सापडलेला हा बेडूक ‘गोएन क्रिकेट फ्रॉग’ प्रजातीतील ‘मिनरव्हारीया गोएमची’ या उपप्रजातीचा आहे. याबाबतचा शोधनिबंध ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

 सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ओंकार यादव, कराडमधील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे डॉ. अमृत भोसले आणि दहिवडी महाविद्यालयाचे डॉ. तेजस पाटील यांनी या प्रजातीची नोंद केली आहे. या बेडकाची ओळख पटवण्यात शास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांचाही सहभाग आहे. यापूर्वी हा बेडूक फक्त गोवा राज्यातील सुरला या गावात आढळत होता.

‘मिनरव्हारीया गोएमची’ हा बेडूक २०१५ साली प्रथमच महाराष्ट्रात आढळला. त्याचा आकार ५.७ सेंमी आहे. ‘गोएन क्रिकेट फ्रॉग’च्या एकूण ३७ प्रजाती देशभरात आढळतात. त्यापैकी काही मोठ्या प्रजातींमध्ये मिनरव्हारीया गोएमची या बेडकाचा समावेश होतो.

The post महाराष्ट्रात ‘गोएन क्रिकेट फ्रॉग’चे अस्तित्व appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FLXdDn
via

No comments:

Post Bottom Ad

Pages