मद्यपी चालकांवर पोलिसांची कारवाई - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 1, 2022

मद्यपी चालकांवर पोलिसांची कारवाई

मुंबई: नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतुक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत १३७५ चालकांवर कारवाई केली. याशिवाय मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी १८ जणांवर, तर भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी १२ चालकांवर वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. 

 करोना रुग्णांचा वाढता आकडा व ओमायक्रॉनमुळे मुंबईत कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, बाग, मैदाने, समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांनी १५ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. त्या पाश्र्वभूमिवर वाहतुक पोलिसांनी  ९० ठिकाणी नाकाबंदी केली होती. करोनामुळे यावर्षीही श्वास विश्लेषक यंत्र (ब्रेथ अ‍ॅनालायझर) वापरावर बंदी होती.

 तपासादरम्यान पोलिसांनी मद्य प्राशन केलेल्या १८ चालकांवर कारवाई केली. तसेच भरधाव वेगाने गाडी चालावल्याप्रकरणी १२ जणांवर, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४०८ जणांवर, दुचाकीवरून तिघांनी प्रवास केल्याप्रकरणी  १६ जणांवर, तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक हजार ३७५ जणांवर वाहतुक पोलिसांनी कारवाई केली.  ३१ डिसेंबर, २०२१ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १ जानेवारीला सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतुक पोलिसांनी ही कारवाई  केली.

The post मद्यपी चालकांवर पोलिसांची कारवाई appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sPyGcT
via

No comments:

Post Bottom Ad

Pages