मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांशी संबंधित खटल्यांची सुनावणी इन कॅमेरा घेण्याचे तसेच प्रकरणांतील तक्रारदार व प्रतिवाद्यांची ओळख उघड करण्यास प्रसिद्धीमाध्यमांना मज्जाव करणारी उच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य व खुल्या न्यायालयातील सुनावणीच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचा दावा करून त्याला अत्याचार पीडितेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणांसाठी कोणतीही नियमावली आतापर्यंत नव्हती. याबाबतची नियमावली उच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात निश्चित केली होती. पॉश कायद्यानुसार तक्रारदार आणि प्रतिवाद्यांची नावे प्रसिद्धीमाध्यमांत उघड करण्यास मज्जाव आहे. परंतु कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडितेच्या बाजूने निर्णय लागला असेल तर पीडितेची ओळख उघड न करता प्रसिद्ध करण्यास मुभा देण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
The post महिलांवरील अत्याचार ; उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांना आव्हान appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mZRmmw
via
No comments:
Post a Comment