राज्यभरात आणखी ५६ निवासी डॉक्टर करोनाबाधित - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

राज्यभरात आणखी ५६ निवासी डॉक्टर करोनाबाधित

मुंबई : राज्यभरात ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे निवासी डॉक्टर बाधित होण्याचे प्रमाणही वेगाने वाढते आहे. बुधवारी एका दिवसात आणखी ५६ निवासी डॉक्टर करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आता राज्यातील बाधित निवासी डॉक्टरांची संख्या २२६ वर गेली आहे.  तिसऱ्या लाटेमध्ये करोनाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना लागण होण्याचे प्रमाणही वाढते आहे. एकीकडे वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे आरोग्य कर्मचारी मोठय़ा प्रमाणात बाधित होत असल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये हळूहळू मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होतो आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणदेखील वाढत आहे.  मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये सर्वाधिक ८० निवासी डॉक्टर तिसऱ्या लाटेमध्ये बाधित झाले आहेत. त्या खालोखाल जेजेमध्ये ७३, तर मुंबईच्या केईएम रुग्णालयात ४० जणांना करोनाची लागण झाली.

The post राज्यभरात आणखी ५६ निवासी डॉक्टर करोनाबाधित appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3eS35iH
via

No comments:

Post Bottom Ad

Pages