मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात कायद्याने निश्चित केलेल्या वेळेत म्हणजे त्यांच्या अटकेपासून ६० दिवसांमध्येच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. तसेच देशमुख यांचा जामिन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी ईडीने केली. आपल्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने अद्याप दखल घेतलेली नाही, असा दावा करून देशमुख यांनी जामिनाची मागणी केली आहे. त्यांच्या या अर्जावर ईडीतर्फे बुधवारी उत्तर दाखल करण्यात आले. त्यात आरोपपत्राची विशेष न्यायालयाने दखल घेतलेली नसल्याचा आधार घेत देशमुख जामिनाची मागणी करू शकत नाही. शिवाय, देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामुळेही न्यायालयाने दखल घेतली नाही या आधारे त्यांची जामिनाची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही, असा दावा ईडीने केला आहे. दरम्यान, देशमुख यांना २ नोव्हेंबरला ईडीने अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत देशमुख यांनी विशेष न्यायालयात मंगळवारी जामिनासाठी अर्ज केला. त्यात देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावताना विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.
The post देशमुखांविरोधातील आरोपपत्र ६० दिवसांतच ईडीचा दावा; जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EXb9cy
via
No comments:
Post a Comment