मुंबई : क्रूझ पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ आरोपींना न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) मेफेड्रॉनसह गुरुवारी एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. अटक आरोपी अचित कुमारच्या चौकशीतून या नायजेरीयन वितरकाची माहिती एनसीबीला मिळाली होती.
आर्यन खानसह मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ मर्चंट यांना केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) याप्रकरणी पहिल्या दिवशी अटक केली होती. त्या सर्वांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपींना कारागृहात न पाठवता एक दिवस एनसीबी कोठडीतच ठेवण्याची विनंती बचावपक्षाकडून करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली आहे. आर्यनच्या जामिनाबाबत शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे.
The post आर्यन खानसह आठ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3liGqQw
via
No comments:
Post a Comment