मुंबई : करोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली शासकीय आणि अनुदानित वसतिगृहे, केंद्रीय निवासी शाळा, आश्रमशाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. करोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून वसतिगृहे सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
मात्र स्नेहसंमेलने, सहली अशा प्रकारच्या गर्दी होण्याची शक्यता असलेल्या कार्यक्रमांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात करोनाचा मुकाबला करण्यासाठी मार्च २०२० पासून सर्व शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे बंद करण्यात आली. आता करोना काहीसा नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या. त्यासाठी जारी करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील वसतिगृहे व निवासी शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दीड वर्षापासून बंद असलेल्या वसतिगृहांचा करोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे शाळा व वसतिगृहांच्या इमारतींचा परिसर स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी, त्याचबरोबर इमारती, भोजनकक्ष, खोल्या, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, कपाटे, टेबल, खुर्च्या इत्यादी वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा वसतिगृहे सुरू करण्यापूर्वी त्यांतील सर्व अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश व उपस्थिती बंधनकारक नाही, त्यांच्या पालकांच्या संमतीवर ती अवलंबून राहील, असे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट के ले आहे.
निर्णय काय? सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण भागातील शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय निवासी शाळांमधील इयत्ता ५ वी ते १२ चे वर्ग आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग तसेच वसतिगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
The post वसतिगृहे लवकरच सुरू स्नेहसंमेलने, सहलींवर मात्र बंदी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/2YB1Y2f
via
No comments:
Post a Comment