‘एमबीए सीईटी’च्या ३५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 7, 2021

‘एमबीए सीईटी’च्या ३५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

परीक्षेत त्रुटी असल्याचा दावा करणारी याचिका दाखल

मुंबई : व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए, एमएमएस) अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) देणाऱ्या ३५ विद्यार्थ्यांचा निकाल ११ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यास उच्च न्यायालयाने प्रवेश परीक्षा प्राधिकरणाला मज्जाव केला आहे. तसेच या प्रकरणी सीईटी प्राधिकरणाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

माहिती पुस्तिकेत दिल्यानुसार ही परीक्षा घेण्यात आली नाही. त्यात त्रुटी होत्या, असा दावा करून या विद्यार्थ्यांनी परीक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तसेच त्रुटी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करून समितीने दिलेल्या अहवालानंतर पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही याचिकाकत्र्यांनी केली. न्यायमूर्ती रमेश धानुका आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या विद्यार्थ्यांचे निकाल सोमवारपर्यंत जाहीर न करण्याचे आदेश दिले.

१६ ते १८ सप्टेंबरदरम्यान सकाळी आणि दुपारच्या सत्रात ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या माहिती पुस्तिकेनुसार विषयानुसार गुणपद्धत विशद करण्यात येणार होती; परंतु तिन्ही दिवशी दोन सत्रांत घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी या नियमाचे सारखेच पालन केले गेले नाही, असा दावा याचिकाकत्र्यांनी केला. परीक्षेचा निकाल २८ सप्टेंबरला जाहीर झाला.

नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप…

प्राधिकरणाने विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश आणि शुल्काचे नियमन) अधिनियम, २०१५ चे उल्लंघन केले आहे, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठांतून पदवीचे शिक्षण घेतले आहे. काहींनी परीक्षेसाठी नोकऱ्याही सोडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतच्या तक्रारींची दखल घेण्याविषयी प्राधिकरणाची भूमिका अयोग्य असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

याचिकाकत्र्यांनी २३ सप्टेंबरला प्राधिकरणाला ईमेलद्वारे परीक्षेतील विसंगती वा त्रुटी दूर करण्याचे आणि पुन्हा परीक्षा घेण्याची विनंती केली. २७ सप्टेंबरला याचिकाकत्र्यांनी प्राधिकरणाला पुन्हा विनंती केली. मात्र प्राधिकरणाने काहीच प्रतिसाद न दिल्याने काही विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रश्नपत्रिका आणि नमुना उत्तरपत्रिकांची मागणी केली. त्यालाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने न्यायालयाकडे साकडे घातल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

The post ‘एमबीए सीईटी’च्या ३५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oDDcsZ
via

No comments:

Post Bottom Ad

Pages