१७ लाख शेतकऱ्यांकडून २१०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

१७ लाख शेतकऱ्यांकडून २१०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा

मुंबई : राज्यातील ४५ हजार कोटी रुपयांची कृषीपंपांची वीजबिल थकबाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी ऊर्जा विभागाने जाहीर केलेल्या योजनेत १३ महिन्यांत १७ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी सहभागी होत २१०० कोटी रुपयांचे वीजबिल भरले आहे.

 ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नवीन कृषी वीज धोरण २०२० मध्ये जाहीर केले. त्यात कृषीपंपांना वीजबिल थकबाकीत सवलत देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर थकबाकी भरल्यानंतर त्या भागातील गावे आणि जिल्ह्यांसाठी त्यातील काही रक्कम वापरण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. गेल्या १२ महिन्यांत १७ लाख ४० हजार कृषीपंप थकबाकीदार ग्राहकांनी २१०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे. वसूल झालेल्या रकमेपैकी १,४०० कोटी रुपये गाव शिवारामध्ये विजेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व विजेची कामे करण्यासाठी वापरण्यात येत आहेत.

मार्च २०१४ अखेर कृषी वीजबिलाची थकबाकी १४ हजार १५४ कोटी रुपयांची होती. ती मागील सरकारच्या काळात ४० हजार १९५ कोटी रुपये झाली. एकूण ४४ लाख ५० हजार ग्राहकांकडे ऑक्टोबर २०२० अखेर ही थकबाकी ४५ हजार ८०४ कोटी रुपये इतकी झाली होती. कृषीपंप विजबिलाच्या थकबाकीमुळे नवीन कृषीपंप वीज जोडणीचे अर्ज सन २०१८ पासून प्रलंबित होते, परंतु आता शेतकऱ्यांकडून वीजबिलाची वसुली वाढल्याने कृषीपंप वीज जोडणी देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध होत आहे.

आघाडी सरकारने सुमारे १० हजार ४२८ कोटी रुपयांची सूट शेतकऱ्यांना दिलेली आहे, तर ४ हजार ६७६ कोटी रुपयांचा विलंब आकार व व्याजात सूट दिलेली आहे. त्यामुळे कृषी वीज धोरणांतर्गत एकूण सुधारित थकबाकी ३० हजार ७०७ कोटी रुपये इतकी झालेली आहे व चालू बिलाची थकबाकी ७ हजार ४८९ कोटी आहे.

या धोरणानुसार मार्च २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम ग्राहकांनी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या दरम्यान सुधारित थकबाकीवर ३० टक्के सूट व एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान भरल्यास सुधारित थकबाकीवर २० टक्के सूट देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांकडून वसूल झालेली रक्कम ग्रामीण भागातील विजेच्या पायाभूत सुविधा तसेच सेवा सुधारण्यासाठी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात, ३३ टक्के संबंधित जिल्ह्यामध्ये खर्च होणार आहे.

The post १७ लाख शेतकऱ्यांकडून २१०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3pi7elT
via

No comments:

Post Bottom Ad

Pages