लस प्रमाणपत्र तपासणी कागदावरच - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 24, 2021

लस प्रमाणपत्र तपासणी कागदावरच

बेस्ट, रिक्षा, टॅक्सीमधून बिनदिक्कत प्रवास

मुंबई : दोन लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सीसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांतून प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने जाहीर केली. मात्र, प्रत्यक्षात या तिन्ही साधनांमध्ये लस प्रमाणपत्रांची तपासणीच होत नसल्याने लस न घेणारे नागरिकही बिनदिक्कत प्रवास करत आहेत. यातून करोनाचा प्रसार आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नवीन नियमावलीचे आदेश आगार व्यवस्थापकांमार्फत चालक, वाहकांना देण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात येते. तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणीचा विसर पडला आहे. तर रिक्षा, टॅक्सी, खासगी प्रवासी बससाठी दोन लसमात्रा प्रमाणपत्राची तपासणी कोण करणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असून परिवहन विभाग व पालिकाही याबाबत मूग गिळून गप्प आहे.

करोनाचा संसर्ग व जगभरात ओमायक्रोन विषाणूने घातलेले थैमान यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासाबाबत काही नियमावली तयार केली. या नियमावलीनुसार दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांनाच बेस्टच्या बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार २९ नोव्हेंबरपासून बेस्ट उपक्रमाने अंमलबजावणी करण्याचा निर्णयही घेतला. त्यासंदर्भात राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश बेस्ट प्रशासनाने सर्व आगार व्यवस्थापकांमार्फत संबंधित बस वाहक आणि चालक यांना दिले.

नियम शिथिल करण्याची मागणी

दोन लसमात्रा प्रमाणपत्र तपासणीची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. शासनाने दोनऐवजी किमान एक लसमात्रा प्रमाणपत्र तपासणीचा नियम करावा. त्यामुळे अनेकांना बेस्टचा प्रवास करता येईल, असे ‘आपली बेस्ट आपल्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी सांगितले. 

‘अमलबजावणी तुम्हीच करा!’

 प्रमाणपत्र असलेल्यांनाच प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय असला तरीही त्याची अंमलबजावणी कुठेच झालेली नाही. चालकांवर याची सक्ती तसेच कारवाई करु नये अशी मागणी आहे. पालिका वा परिवहन विभागाने त्याची अंमलबजावणी करावी, असे स्वाभिमान टॅक्सी संघटनेचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितले.

तपासणी अशक्य

बेस्ट किंवा टॅक्सीतून प्रवास करण्याआधी दोन लसमात्रा घेतलेल्या प्रमाणपत्राची तपासणी होत नाही. सध्या बेस्ट बसना प्रचंड गर्दी असते. उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रमाणपत्राची तपासणी करणार कशी, असा प्रश्न दादर येथील प्रवासी अक्षय कदम यांनी उपस्थित केला.

The post लस प्रमाणपत्र तपासणी कागदावरच appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3H7HcI8
via

No comments:

Post Bottom Ad

Pages