मिठागरांचा आराखडा रखडला - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

मिठागरांचा आराखडा रखडला

सल्लागारसंबंधी नियुक्तीसाठीच्या निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याच्या दृष्टीने बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. पण हा आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएला सल्लागारच सापडत नसल्याने यासाठीच्या काढण्यात आलेल्या निविदेला चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात अधिकाधिक परवडणारी घरे बांधण्यासाठी मिठागरांच्या जागेचा पर्याय पुढे आणण्यात आला. त्यानुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मिठागरांच्या जमिनी किती आहेत, कुठे आहेत, किती जमीन सीआरझेडखाली आणि किती जमीन विकासासाठी उपलब्ध होईल या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी तसेच जागेचे सर्वेक्षण करून जागेच्या वापराचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी जुलैमध्ये पहिल्यांदा निविदा मागविली. मात्र डिसेंबर संपत आला तरी अजून एमएमआरडीएला सल्लागार निवडण्यात यश आलेले नाही. परिणामी आराखडा रखडला आहे.  सल्लागार कंपन्यांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने एमएमआरडीएवर निविदेला वारंवार मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे. एमएमआरडीएने एकदा, दोनदा नव्हे तर चौथ्यांदा आता निविदेला मुदतवाढ दिली आहे.  दुसरी मुदत २० ऑक्टोबरला संपली असून या वेळी प्रतिसाद न मिळाल्याने एमएमआरडीएने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली.  तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ १५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने आता चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार १७ जानेवारीपर्यंत निविदा सादर करावी लागणार आहे. या मुदतवाढीत निविदेला प्रतिसाद मिळाला नाही तर काय करायचे, यापुढेही मुदतवाढ द्यायची की निविदा रद्द करायची, असे अनेक प्रश्न आता एमएमआरडीएसमोर आहेत.

याविषयी एमएमआरडीएच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी निविदेला मुदतवाढ दिल्याचे सांगितले. मात्र या वेळीही प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे काय करणार, यावरील प्रतिक्रियेस नकार दिला. 

The post मिठागरांचा आराखडा रखडला appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/32rXz31
via

No comments:

Post Bottom Ad

Pages