कोकणातील आंबाबागायतदार शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 21, 2021

कोकणातील आंबाबागायतदार शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन

मुंबई : हवामान बदलामुळे अडचणीत आलेल्या कोकणातील आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांनी सरकारी मदतीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे २३ डिसेंबर रोजी हे आंदोलन होणार आहे.

गेली दोन वर्ष सलग आलेली चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि करोना यामुळे कोकणातील आंब्यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रीवरही परिणाम झाला आहे. आर्थिक फटका बसल्याने गेल्या पाच वर्षांत अनेक शेतकरी कर्ज फेडू शकलेले नाहीत. परिणामी, नवीन कर्जही मिळत नाही. त्यामुळे सरकारकडून आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील सरकारने व्याजमाफी जाहीर केली, पण प्रत्यक्षात दिली नाही. त्यानंतर व्याजामध्ये सवलत देतो असे सांगण्यात आले, तीही दिली नाही. कर्जमाफीबाबतही दुर्लक्षित घटक म्हणूनच आमच्याकडे पाहिले गेले. म्हणून आंदोलनाची वेळ आली, असे आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या

कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.

हापूस आंबा व अन्य फळपिकांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

कोकणातील  शेतकऱ्यांना कृषी दराने वीजपुरवठा करावा.

कोकणातील काजू आणि सुपारी या दोन मुख्य पिकांना हमीभाव मिळावा.

The post कोकणातील आंबाबागायतदार शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EjAsVV
via

No comments:

Post Bottom Ad

Pages