दीर्घकालीन संबंधांनंतर लग्नास नकार म्हणजे फसवणूक नव्हे - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 23, 2021

दीर्घकालीन संबंधांनंतर लग्नास नकार म्हणजे फसवणूक नव्हे

मुंबई : परस्पर संमतीने बऱ्याच कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देण्याला फसवणूक म्हणता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने नुकताच दिला. या प्रकरणातील तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याचिकाकर्त्यांवर  बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फेब्रुवारी १९९९मध्ये सत्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांला बलात्काराच्या आरोपांतून दोषमुक्त केले होते. मात्र  फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत एक वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात याचिकाकर्त्यांने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  मात्र तक्रारदार तरुणीची फसवणूक करून याचिकाकर्त्यांने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा कुठलाही पुरावा समोर आलेला नाही. याउलट पुराव्यांवरून दोघांमध्ये परस्पर संमतीने शरीरसंबध ठेवण्यात आले होते, असे नमूद करत न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी याचिकाकर्त्यांची फसवणुकीच्या आरोपातून सुटका केली.

तसेच लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूक होते का? हा प्रश्न याचिकाकर्त्यांच्या अपिलावरील सुनावणीच्या वेळी आपल्यासमोर होता. परंतु तक्रारदाराने दिलेल्या साक्षीचा विचार करता तिने याचिकाकर्त्यांशी लग्नाच्या आमिषामुळे किंवा त्याबाबतच्या चुकीच्या समजुतीतून शरीरसंबंध ठेवल्याचे दिसून आलेले नाही. किंबहुना याचिकाकर्त्यांचा तिच्याशी लग्न करण्याचा कधीच इरादा नव्हता हे दर्शविणारा पुरावाही समोर आलेला नाही.  चुकीच्या समजुतीतून तक्रारदार तरुणीने शारीरिक संबंधांना संमती दिली होती हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा नाही. त्यामुळे केवळ लग्नास नकार देणे हा गुन्हा ठरत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल रद्द केला.

The post दीर्घकालीन संबंधांनंतर लग्नास नकार म्हणजे फसवणूक नव्हे appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qnEYNT
via

No comments:

Post Bottom Ad

Pages