मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) चिजबंदर परिसरातील नूर बाग येथून ४४२ लिटर भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त केला. तेलाचा दर्जा योग्य नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत तीन लाख ३१ हजार १९६ रुपये आहे. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
एफडीएच्या मुंबई विभागाला मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी बुधवारी नूर बाग येथील केशवजी नाईक रोडवरील अरिहंत मेन्शन येथील मेसर्स महाकाली मसाला पेढीवर छापा टाकला. या वेळी ऑलिव्ह पॉमेस ऑइल (व्हिटोरिओ) नावाचे खाद्यतेल कमी दर्जाचे असल्याचा पथकाला संशय आला. त्यामुळे तेथील ४४२ लिटर तेल जप्त करण्यात आले असून तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली. तेलाच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जप्त करण्यात आलेला साठय़ाची किंमत तीन लाख ३१ हजार १९६ रुपये आहे. या तेलाचे उत्पादन पालघर येथील मेसर्स कॅम्पबेल अॅग्रो इंडस्ट्रीजकडून करण्यात आले आहे. खरेदी करताना योग्य ती काळजी घ्या तसेच काहीही संशयास्पद आढळल्यास एफडीएशी संपर्क साधा, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.
The post ४४२ लिटर भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3sw3cse
via
No comments:
Post a Comment