३१ आरोपींवर कारवाई, २४० ठिकाणी शोध मोहीम
मुंबई : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ हाती घेतले होते. या कारवाईत ३१ फरार आणि विविध प्रकरणात हव्या असलेल्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. संपूर्ण शहरात २४० ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली, तर ७ हजार ४९१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १ हजार ६३९ वाहनचालकाविरुद्ध, तसेच तीन मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली.
मुंबईत नाताळनिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी अचानक पोलिसांनी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरू केले. गुरुवारी रात्री अकरा वाजता सुरू झालेले ‘ऑल आऊट ऑपरेशन’ रात्री दोन वाजता संपले. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ पोलीस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती.
पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांना मार्गदर्शन केले. या कारवाईत पोलिसांनी ३१ फरार आणि हव्या असलेल्या आरोपींना, तर ८० अजमीनपात्र वॉरंटमधील आरोपींना अटक केली. १९७ जणांवर एमपीडीए कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.
अमलीपदार्थ खरेदी-विक्री तसेच सेवन केल्याप्रकरणी १२२ जणांवर कारवाई करण्यात आली. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३९ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून चाकू, तलवार आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अवैध दारू विक्री, जुगार क्लब आदी २८ ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, मात्र ही कारवाई सुरू असतानाही मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या ४३ तडीपार आरोपींवर १४२ कलमांतर्गत, तसेच १२०, १२२, १३५ कलमांतर्गत १२५ जणांवर कारवाई करण्यात आली होती. संपूर्ण मुंबई शहरात पोलिसांनी २४० ठिकाणी कोिम्बग ऑपरेशन घेऊन अभिलेखावरील १ हजार ७३ आरोपींना तपासण्यात आले, त्यात २६१ आरोपी सापडले असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२३ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात ७ हजार ४९१ दुचाकी आणि चारचाकी वाहने तपासण्यात आले, यावेळी एक हजार ६३९ वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर तीन मद्यपी वाहनचालकावर कारवाई केली. शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ९२१ हून अधिक हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ५३२हून अधिक धर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली.
The post नाताळच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची धरपकड appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3yWjKuw
via
No comments:
Post a Comment